माझ्यावर असे १०० खटले जरी घातले, तरी मी हिंदुत्वाचे कार्य करतच राहीन ! – करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी

0
1403

 

 

जामीन मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी म्हणाले, ज्या घटनेत मला अटक करण्यात आली, त्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मी हिंदुत्वाचे कार्य करू नये, तसेच मी भाषणे देऊ नयेत, यांसाठीच मला कारागृहात पाठवण्यात आले.माझा त्या घटनेशी काहीही संबंध नाही, असे वरिष्ठ पोलीसही सांगत असतांना केवळ राजकारण्यांच्या दबावामुळेे मला अटक करण्यात आली. माझ्या अटकेमागे मोठे षड्यंत्र आहे. याचा परिणाम आम्ही पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ आणि सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवू.

माझ्यावर असे १०० खटले जरी घातले, तरी मी हिंदुत्वाचे कार्य करतच राहीन. या कालावधीत माझ्या वतीने न्यायालयात लढलेले अधिवक्ता यांचे, तसेच माझ्या समवेत असलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मी आभार मानतो.

यानंतर स्वामीजींना एका पत्रकाराने प्रक्षोभक भाषण करणे कितपत योग्य आहे ?, असा प्रश्‍न विचारला. यावर स्वामीजी म्हणाले, तुम्ही माझ्या भाषणाची चित्रफीत पहा. त्यात मी पाकिस्तानच्या आतंकवादाविषयी बोललो आहे. त्यांच्याविषयी बोलल्यावर येथील मुसलमानांना वेदना का होतात ? हाही एकप्रकारे आतंकवादच नव्हे का ? मग त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही ? माझ्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीत मी पाकिस्तानी आतंकवाद्यांविषयी बोलून येथील मुसलमानांना लक्ष्य करत आहे, असे म्हटले आहे. मग माझा प्रश्‍न आहे की, पाकमधील आतंकवाद्यांचा आणि येथील माझ्या विधानावर आक्षेप घेणारे मुसलमान यांचा संबंध काय आहे ? अन्य मुसलमानांविषयी माझा आक्षेप नाही.