सी.सी.आय चे कापुस खरेदी केंद्र वरूड येथे चालु करण्यात यावे – कापसाचे गठ्ठे डोक्यावर घेऊन स्वाभिमानाने केले अभिनव आंदोलन

0
1116
Google search engine
Google search engine

*स्वाभिमानी शेतकरी संघटना वरूड मोर्शी तालुका यांची मागणी*

रुपेश वाळके / मोर्शी –

*विदर्भामध्ये तसेच पर्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यामध्ये कापुस लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. कोरडवाहू तसेच ओलिताखाली क्षेत्र वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे आलेले आहे. सध्या खुल्या बाजारात कापासाची विक्री होत असुन अल्प्‍ दराने कापसाची लुट खाजगी व्यापारी करत आहे. म्हणुन केद्र शासनाच्या अत्यारितीत असणाऱ्या सी.सी.आय. चे कापुस खरेदी केद्र चालु करून वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची हमी भवाने खरेदी करण्यात यावी

*वरूड तालुक्यामध्ये 2018 चे कपाशी लागवडीचे क्षेत्र 30216 हे. असुन त्यातील उत्पादन एकरी प्रति 4 ते 5 क्विंटल आहे. तर मोर्शी तालुक्यातील कापुस लागवडीचे क्षेत्र 28940 हे.असुन एकरी उत्पादन 3 ते 4 प्रति क्विंटल आहे. दोन्ही तालुक्यातील कपाशी पिकाचे लागवडी क्षेत्र प्रचंड वाढले असतांना उत्पादनात दरवर्षीच्या तुलनेत तफावत नसतांना कपाशीच्या खरेदीची हमी केंद्र शासनाच्या कॉटन कॉपोरेशन ऑफ इंडिया, सी.सी.आय. ची असतांना सुध्दा कापुस खरेदी पासुन वरूड मोर्शी तालुक्याला डावलण्यात आलेले आहे.

यात दोन्ही तालुक्यातील कापुस शेतकऱ्यांना 100 कि.मी. अंतरावर किंवा मध्यप्रदेशामध्ये जाऊन विकावा लागत आहे. एकतर भाजप सरकारने कापसाच्या उत्पादन खर्चामध्ये प्रचंड तफावत ठेवून चुकीचा हमीभाव काढलेला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरूण काढण्याकरीता गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुध्दा 500 रू. प्रति क्विंटल बोनस देण्यात यावे व आठ दिवसाच्या आत वरूड येथे सी.सी.आय. चे कापुस खरेदी केद्र त्वरीत चालु करण्यात यावे.

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मा जिल्हाधिकारी अमरावती यांना करण्यात आली त्या वेळी मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या वेळी देवेंद्र भुयार, सुमित गुर्जर, शैलेश ढोबळे,प्रवीण देशमुख, गोपाल ब्राह्मणे,योगेश हरफॉळे, गणेश चोधरी, नितीन केवटे, निखिल बनसोड,प्रभाकर गायधने,निलेश वानखडे,आशिष पाजनकार,रोशन बुरंगे, राजेंद्र शेळके,बबन गोटे,ध्यानेश्वरी ठेंगेवार, प्रकाश देशमुख, पंकज पुंड,भूषण चोधरी,अजय तुमडाम,वामन कापसे,विवेक कठाने,विजय दरोकर, कैलास पोवार इत्यादी स्वाभिमानी चे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते*