उद्या सरकार विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’ – मेळावा – हजारो शेतकरी बांधवांनी आक्रोश मेळाव्यात सहभागी होण्याचे आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी केले आवाहन

0
809
Google search engine
Google search engine

*अमरावती येथे उद्या काँगेस पक्षाचा विभागीय आक्रोश मेळावा !*

रुपेश वाळके / अमरावती –

सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. उद्या ७ नोव्हेंबर ला अमरावती येथे विभागीय ‘जनआक्रोश’ राबविला जाणार असून अमरावती विभागाचा मेळावा उद्या ७ नोव्हेंबरला अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील भाजप -शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपल्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. वास्तविक नोटाबंदी व जीएसटीचार्वच स्तरातील लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकऱ्याना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. उद्या ७ नोव्हेंबर ला ‘जनआक्रोश’ राबविला जाणार असून अमरावती विभागाचा मेळावा अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आंदोलन व्यापक स्वरुपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कीटकनाशकांच्या बळींची संख्या वाढतच आहे. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी केला. राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याने जनतेत आक्रोश आहे. काँग्रेस जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या पाठिशी उभी आहे. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘शेतकरी दिंडी’काढण्यात येणार आहे. याबातची तारीख प्रदेश काँग्रेस लवकरच निश्चित करणार असल्याची माहिती आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी दिली.कापूस-सोयाबीनला भाव नाही कापसला ३५०० रुपये तर सोयाबीनला २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.संत्राचीही अशीच अवस्था आहे. कापसाला ७००० तर सोयाबीनला ५००० रुपये भाव मिळावा. राज्य सरकार उत्पादन खर्चाच्या आधारे शेतमालाचे भाव काढतात. परंतु शेतमालाचे भाव केंद्रीय कृषी मूल्य आयोग निश्चित करते. केंद्राचे भाव कमी असल्याने या भावातील फरकाची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी जण आक्रोश मेळाव्यात करणार असल्याचे आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितले .

शासनाने हजारो शेतकऱ्यांची वीज तोडली !

शेतकरी संकटात असतानाही थकबाकीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा माहवितरण कंपनीने लावला आहे. अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकार आर्थिक संकटात असूनही मोठ्या उद्योगपत्यांना कर्ज माफ करीत असल्याची माहिती आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी दिली.