मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात गठीत उपसमितीची बैठक संपन्न

356
मुंबई –
मराठा मोर्च्याच्या विविध मागण्यांसंदर्भात गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या विविध विषयांचा आढावा घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कोपर्डी प्रकरणछत्रपती शाहू महाराज योजनामराठा समाजाकरिता वसतिगृहाच्या बांधकामासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूखंड देणेवसतिगृहांसाठी भाडे,सारथी संस्थाअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतक-यांच्या 3 लाख मुलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविणेवैयक्तिक व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजनाएफपीयू योजनाया विषयांचा आढावा घेवून चर्चा करण्यात आली.
बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे सदस्य शिक्षण मंत्री विनोद तावडेजलसंपदा मंत्री गिरीष महाजनसहकार मंत्री सुभाष देशमुखवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैनसामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सुचिता भिकाने तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.