‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांचे पडदे जाळून टाकू ! – आमदार टी. राजासिंह यांची चेतावणी

0
819
Google search engine
Google search engine

भाग्यनगर –  राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या राजपूत समुदायाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘स्क्रीन जाळणार्‍या व्यक्तीला जामीन मिळवून देण्याचे दायित्व माझे असेल’, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की,

१. देशभरात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध केला जात आहे; पण येथे कोणीही बोलत नाही. आपले रक्त थंड झाले आहे. हिंदु संस्कृतीची प्रतिमा कोणी मलीन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना धडा शिकवू.

२. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तो राजपूत समुदायाला दाखवावा, त्यांच्याकडून संमती मिळाल्यानंतर आम्ही प्रदर्शनात कुठलाही अडथळा निर्माण करणार नाही.