नाशिक विभाग आघाडीवर – एस्.टी. वाहकांच्या भ्रष्टाचाराची १ लक्षांहून अधिक प्रकरणे उघड ५० लक्ष रुपये दंड वसूल

0
739
Google search engine
Google search engine

मुंबई –

 

 

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) मार्ग तपासणी पथकांनी वाहकांची गत २ वर्षांतील तिकीट अपव्यवहाराची १ लक्ष ६ सहस्र ७१० प्रकरणे उघडकीस आणली. या प्रकरणी संबंधित वाहकांकडून भाडे आणि दंड मिळून ५० लक्ष रुपये वसूल करण्यात आले. अशा प्रकरणांना आळा बसावा; म्हणून एस्.टी. महामंडळाकडून वर्षभरापूर्वी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली होती, तरीही अपव्यवहारांना आळा बसलेला नाही, हे विशेष आहे.

 (शासनाने भ्रष्टाचारी एस्.टी. कर्मचार्‍यांवर अशी कारवाई करावी की, असे प्रकार करण्याचे धाडस अन्य कर्मचारी करणार नाही ! – संपादक)

अपहारातील काही प्रमुख सूत्रे

१. महामंडळात जवळपास ३५ सहस्र वाहक आहेत.

२. प्रवाशांकडून प्रवासभाडे घेऊन तिकीट न देणे, प्रवास भाडे पूर्ण वसूल करून अल्पदराचे तिकीट देणे, वापरलेली तिकिटे पुन्हा प्रवाशांना देणे, रोख रक्कमेत घट होणे, अतिरिक्त रोख रक्कम सापडणे आदींचा समावेश आहे.

३. इतर प्रकरणांमध्ये मालवाहतुकीचे तिकीट शुल्क ठरलेले असतानांही तिकिटांची रक्कम अल्प आकारणे, न्यून अंतरासाठी अधिक तिकीट आकारणे, ओळखीच्या प्रवाशांना तिकीट देऊन त्याचे पैसे न घेणे या प्रकरणांचा समावेश आहे.

४. ५१ सहस्र प्रकरणांमध्ये नाशिक विभाग आघाडीवर असून त्यानंतर पुणे, संभाजीनगर, मुंबई, नागपूर या विभागांचा क्रमांक लागतो.