मुख्यमंत्री कृषि संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा

0
582
Google search engine
Google search engine

भंडारा  –

 

शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषि संजीवनी योजना जाहिर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत होवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक अभियंता, महावितरण यांनी केले आहे.
योजनेची वैशिटये या प्रमाणे आहेत. राज्यातील सर्व कृषि ग्राहक उपसा जलसिंचन योजनेसहीत या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र राहतील. माहे एप्रिल ते जून 2017 हे त्रैमासिक चालू विज बिल 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी भरुन हया योजनेत सहभागी होता येईल. ज्या प्रमाणात पाच समान हप्ते कृषि ग्राहक वेळेवर भरतील त्या प्रमाणात कृषिपंप ग्राहकाचे व्याज व दंडनीय आकार माफ करण्यात येईल. पाच त्रैमासिक हप्ते अनुक्रमे डिसेंबर 2017,मार्च, जुन, सप्टेंबर व डिसेंबर-2018 अखेरीस भरणे आवश्यक राहील. योजनेत भाग घेवून माहे मार्च-2017 अखेरची मुळ थकबाकी 31 डिसेंबर 2018 या पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक आहे. सदर योजनेत भाग घेवून मुहे थकबाकी 31 डिसेंबर 2018 या पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देकासहीत भरणे बंधनकारक आहे.
मार्च 2017 अखेरीस मुळ थकबाकी रक्कम या प्रमाणे हप्त्यात भरावयाची आहे.
मुळ थकबाकी भरावाचे समान हप्ते कालावधी 


30 हजार रुपयांपेक्षा कमी 05 प्रती तीन महिने 
30 हजार रुपयांपेक्षा अधिक 10 प्रती दिड महिना

ज्या कृषि ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही अथवा योजनेंतर्गत ठरविण्यात आलेली रकमेचा भरणा केला नाही, अशा कृषि ग्राहकांना योजनेकरीता अपात्र ठरविण्यात येईल. तसेच ग्राहकांकडून व्याज व दंडासहित पूर्ण रकमेची थकबाकी वसूली नियमाप्रमाणे करण्यात येईल.
शेतकऱ्यांना सदर योजनेची माहिती देण्याकरीता भंडारा मंडळांतर्गत येणाऱ्या शाखानिहाय मेळावे या प्रमाणे असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
तुमसर तालुका- 9 नोव्हेंबर 2017 देव्हाडी, तुमसर ग्रामीण 10 नोव्हेंबर , पवनी तालुका- 9 नोव्हेंबर अडयाळ, भंडारा ग्रामीण- 9 नोव्हेंबर मानेगांव, साकोली तालुका- 9 नोव्हेंबर वडद व सानगडी, लाखनी तालुका- 10 नोव्हेंबर पोहरा व पिंपळगाव, लाखांदूर तालुका- 10 नोव्हेंबर 2017 बारव्हा येथे होणार आहे.