MIDC प्रशासनाने चार चाकी गाडीचे शोरूम केले सिल तर शोरूम गेट वर औद्योगिक सहकारी संस्थेचा फलक

0
771

प्रतिनिधि – उमेर सय्यद -अहमदनगर

एम आय डी सी परिसरात वाणिज्य वापरात असलेले चार चाकी वाहनांच्या शोरूम ला एम आय डी सी प्रशासनाने लावले सील
नगर शहरा लगत असलेल्या औदयोगिक वसाहती परिसरात भूखंड घेऊन तो औदयोगिक कारना करीता न वापरता वाणिज्य कामा बाबत वापरत असल्याचे निदर्शनास आल्याने एम आय डी सी प्रशासनाने चार चाकी विक्री करणारे फोर्ड शोरूम ला सील केले आहेत त्या मुळे एकच खळबळ उडाली आहे ! तर कारवाई करण्या आगोदरच शोरूमच्या गेट वर औद्योगिक संस्थेचा बोर्ड लावून शोरूम पहिल्यापासून बंद असल्याचे निदर्शनास आले मात्र तरीही या शोरूम ला सिल करण्यात आले आहे ! मात्र अहमदनगर एम आय डी सी मध्ये एक ना अनेक कंपनीचे शोरूम असल्याने ही कारवाई फ़क्त फोर्ड पूर्ति का असा सवाल आता नगरकरांना पडला आहे !