तुळजापूर येथे राजे तरुण मंडळाच्या सदस्यांच्या पुढाकाराने हिंदु धर्मजागृती सभा

0
557
Google search engine
Google search engine

सभेत हिंदुतेजाचा जागर !

श्रीमत नारायणस्वरूप गुरुमाऊलींचा अमृतमहोत्सव आला समीप ।
त्यांच्या चैतन्यमयी वर्षावाने साधक आणि धर्माभिमानी झाले हो प्रफुल्लित ॥
वाटे द्यावा आनंद आपणास आमच्या आध्यात्मिक प्रगतीचा ।
उद्धार करा हो गुरुराया या अमृत वर्षावातूनी आम्हा सर्वांचा ॥
– कु. वर्षा कुलकर्णी, बार्शी, सोलापूर.

मार्गदर्शन करतांना श्री. राजन बुणगे आणि उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
तुळजापूर – हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील रायखेल येथे ५ मे या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे २२ एप्रिल या दिवशी झालेल्या धर्मजागृती सभेला उपस्थित राहून प्रभावित झालेल्या राजे तरुण मंडळाच्या सदस्यांनी स्वत:हून सभेचे आयोजन केले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभागृहात सभा घेण्यात आली. या वेळी ४० हून अधिक हिंदु तरुण उपस्थित होते. उपस्थितांकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. सभास्थळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी श्री. विलास मगर, प्रकाश मिसाळ, लिबांजी नगांले, दत्ता घाडगे, प्रवीण जाधव, दत्तात्रेय मगर आदी धर्माभिमान्यांनी सभा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे म्हणाले, ‘‘हिंदुविरोधी धोरण संघटितपणे हाणून पाडून, तसेच जात विसरून केवळ हिंदू म्हणून संघटित होणे आवश्यक आहे.’’