‘नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढू शकत नाहीत !’

417
जाहिरात
कोलकाता –
 आम्हाला ब्रिटीश सरकारच्या काळात गाडीवर लाल दिवा लावण्याची अनुमती मिळाली होती. त्यामुळे आता नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरील लाल दिवा काढू शकत नाही, असे आव्हान बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी दिले आहे. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी सरकारी गाड्यांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्याला बरकती यांनी विरोध केला आहे. बंगालमधील भाजप नेते सी.के. बोस यांनी म्हटले की, बरकती हे देशद्रोही आहेत. त्यांना तात्काळ कारागृहात डांबायला हवे.
बरकती म्हणाले की, मी एक शाही इमाम आहे. न्यायालयाने आदेश दिला असला, तरी मी माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढणार नाही. 
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।