त्यांनी भागविली अनेक भक्तांची तृष्णा – 10000 भक्तांनी घेतले नृसिह महाराजांचे दर्शन

0
741
Google search engine
Google search engine

बादल डकरे  / चांदुर बाजार-

चांदुर बाजार तालुक्यातील प्रसिद्ध असलेले ग्राम देऊरवाडा हे देवाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे.त्यातच काल दिनांक 9 मे या गावातील अनेकांचे आराध्य असलेले भगवान नृसिह यांची जयंती होती.त्यानिमित्त या गावामध्ये दूरवरून आलेल्या अनेक भक्तांनी आपली हजेरी लावली.सकाळी 7 वाजल्या पासून मंदिरामध्ये गर्दी पाहावयास मिडाळी.एकीकडे भक्ताची गर्दी वाढतच होती आणि दुसरी कडे त्या भक्तांना तृष्णा भागविण्याचे कार्य देऊरवाडा येथील युवक वर्ग करीत होते.
हिरण्यकश्यप यांचा वध केल्यानंतर नृसिह महाराज यांच्या नखामध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.तेव्हा त्यांनी त्यावेळी देऊरवाडा या गावातील बगाडी या नाल्या मध्ये वाहत्या पाण्या मध्ये नखे धुवून ते शांत केल्याची अशी पौराणिक आखाय्यीका आहे.तेव्हा पासूनच या गावातील अनेक भाविक भक्त महाराज यांची पूजा अर्चना करू लागले.त्या नाल्याचे वरच महाराज यांचें भव्य असे मंदिर बांधलेले आहे.
काल जयंती निमित्त भाविक भक्ताची तहान भागविण्याचे काम देऊरवाडा येथील युवकांनी मागील 2 वर्ष पासून हाती घेतले आहे.तर ते सर्व युवक देऊरवाडा येथील नृसिह महाराज यांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भक्ताचे तहान भागविताना यावेळी पाहावयास मिडाळे.यावेळी पाण्याचे वाटप करताना,सारंग सुने,अभिजित पोटे,तुषार सुने,सुमित सुने,राम कवीटकर,सुरज सुने तसेच मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होते.

आम्ही मागील वर्षी पासून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.जयंतीला हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शना करिता येत असतात त्यांना आणि पाणी वाटपाचे काम करीत आहे.या साठी गावातील सर्व युवा पिढी आम्हाला सहकार्य करीत असतात.

-स्वप्नील घायर.देऊरवाडा