प्रहारच्या डेरा आंदोलनाचे रूपांतर झाले अभिनंदनामध्ये शासनाच्या ३१ मे पर्यंतच्या तुर खरेदी आदेशाचे केले स्वागत – ३१ मे पर्यंत एकही दिवस तुर खरेदी बंद पडल्यास तीव्र आंदोलनाची चेतावनी

300
जाहिरात

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

स्थानिक प्रहार संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या तुर खरेदीबाबच्या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डेरा आंदोलनाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांची घरी असलेली तुर हमी भावानुसार घेण्यात यावी ही मुख्य मागणी होती. मात्र ही मागणी आंदोलनाच्या आदल्यादिवशी सरकारने मान्य करून ३१ मे पर्यंत तुर खरेदीचे आदेश काढले. त्यामुळे या आंदोलनाचे रूपांतर अभिनंदनामध्ये करण्यात आले होते, हे प्रहारचे वेगळेपण बुधवारी दिसुन आले. मात्र आदेश आल्यानंतर ३१ मे पर्यंत एकही दिवस तुर खरेदी बंद पडल्यास तीव्र आंदोलनाची चेतावनी तहसिलदार, सचिव यांना दिलेल्या निवेदनातुन दिली आहे.


             बुधवारी प्रहार संघटनेतर्फे डेरा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेचाही सहभाग होता. सरकारने ३१ मे पर्यंत तुर खरेदीचे आदेश नुकतेच काढल्यामुळे या आंदोलनाचे रूपांतर अभिनंदनामध्ये करण्यात आले. यामध्ये प्रहार, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदार बि.ए. राजगडकर यांना तहसिल कार्यालयात व बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांना बाजार समितीत जाऊन हार घालुन निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी निवेदनसुध्दा देण्यात आले. ३१ मे पर्यंत एकही दिवस खरेदी बंद पडल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र बाजार समितीला तुर खरेदीचा नवीन आदेश अद्यापही प्राप्त झालेला नसुन सोमवारपर्यंत आदेशाची वाट पाहणार आहो व आदेश लवकर न आल्यास नंतर पुढील आंदोलन ठरवणार असल्याचे प्रहार तालुकाप्रमुख सौरभ इंगळे यांनी सांगितले.

          यावेळी प्रहारचे तालुकाप्रमुख सौरभ इंगळे, शिवसेनेचे राजुभाऊ निंबर्ते यांच्यासह प्रदिप नाईक, विक्रम तायडे, मनिष कोहरे, बंडु आंबटकर, स्वप्निल मानकर, गौरव चव्हाण, ऋषिकेश फटे, शुभम पाटील, प्रफुल्ल मारोटकर, सुरज चव्हाण, शुभम वाहाने, राहुल अंबापुरे, विनोद दुधकवरे, मोरेश्वर राजुरकर, रामदास गोंडाणे, खुशाल देशमुख तसेच शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते..
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।