गळा आवळून केला पत्नीचा खुन – शिक्षक पतीने दिली हत्येची कबुली <><> कविता कटकतलवारे (इंगोले) मृत्यु प्रकरण

0
740
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) –


चांदुर रेल्वे शहरातील मेहेरबाबा परीसरात राहणारे शिक्षक किर्तीराज इंगोले याने पत्नी कविताचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती नांदगाव पोलीसांना दिल्याचे समजते. आरोपी इंगोले 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. 
स्थानिक मेहेरबा­बा नगर मधील रहिवासी सौ. कविता कटकतलवारे (इंगोले) (वय- 40) ह्­या नगर परीषद, चांदुर रेल्वे मार्फत चालवि­ण्यात येणाऱ्या श्री. छत्रपती शिवाजी महा­राज प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गाला वर्ग­शिक्षिका म्हणुन गेल्­या 10 वर्षापासुन कार्यरत होत्या. मंगळवारी शाळा संपल्यानंतर त्या सायंकाळी चांदुर रेल्वे वरून नांदगाव ला निघाल्या होत्या. परंतु नांदगाव खंडेश्­वर वरून 4 कि. मी. अं­तरावर असलेल्या येणस गावाजवळ त्यांचा मृतदेह सकाळी मॉर्निंग वॉ­कला जाणाऱ्या काही लोकांना बुधवारी आढळला. प्राप्त माहितीनुसार, सदर घटनेची तक्रार मृतक कविताचा भाऊ गजानन कटकतलवारे यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीसांना केली. नांदगाव पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन प्रथम संशयीत म्हणुन मृतकाचे पती किर्तीराज इंगोलेला बुधवारी ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतर आरोपी इंगोले ने आपला गुन्हा कबुल केल्याचे समजते. आरोपी किर्तीराज इंगोले तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी त्याने सुट्टी घेऊन दिवसभर पत्नीच्या गतिविधींवर लक्ष ठेवुन होता. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता कविता एसटीने नांदगाव खंडेश्वरला पोहचली असता पती किर्तीराज पहिलेच नांदगाव बस स्टॅंडवर पोहचलेला होता. त्याने कविताला आपल्या दुचाकीवर बसवुन नांदगावपासुन 4 कि. मी. अंतरावर असलेल्या येनस गावाजवळ नेले.  येथे दोघांच्या मधात पैशावरून विवाद झाला. याच विवादा दरम्यान रागाच्या भरात किर्तीराजने दोन्ही हातांना पत्नी कविताचा गळा दाबला. यामध्ये कविताचा जागीच मृत्यु झाला. यानंतर रात्री किर्तीराज दुचाकी घेऊन चांदुर रेल्वेला आला. नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयाची प्राथमिक पीएम रिपोर्ट पोलीसांना मिळाली आहे. ज्यामध्ये श्वास कोंढला गेल्यामुळे कविताचा मृत्यु झाल्याचा उल्लेख केला गेल्या आहे. आरोपी किर्तीराज इंगोलेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे.