हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी ‘पद्मावती’ चित्रपटाला दुबईतून अर्थपुरवठा !

0
740
Google search engine
Google search engine

भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

नवी देहली – ‘पद्मावती’ चित्रपटाच्या मागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी दुबईमधून पैसे पाठवण्यात येत आहेत. भारतीय हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी हे पैसे पाठवण्यात येत आहेत. दुबईतील लोकांची इच्छा आहे की, ‘चित्रपटात मुसलमान राजांना हिरोच्या (नायकाच्या) रूपात सादर केले जावे आणि हिंदु महिला त्यांच्याशी संबंध बनवण्यासाठी उत्सूकच असतात, असे दाखवावे.’ या चित्रपटाला करण्यात आलेल्या अर्थपुरवठ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे.

राजस्थान सरकारकडून चित्रपट पहाण्यासाठी समितीची स्थापना

राजस्थान सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट पहाण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री गुलाबचंद कटारिया या समितीचे प्रमुख आहेत. या समितीने चित्रपट पाहून अहवाल दिल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्णय घेतला जाणार आहे.