धर्मपूरी दारुबंदी आंदोलनाला प्रहार चा पाठींबा

0
771
Google search engine
Google search engine

नातेपुते : :-

धर्मपूरी येथे पोलीस पत्नीने दारुबंदी साठी सुरु केलेल्या उपोषणाला काल आ. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला. पक्षाचे संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पक्षाच्या पाठींब्याचे पत्र दिले. काल उपोषणाचा चौथा दिवस आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री अतुल खुपसे यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसापासून पोलीस पत्नीने आपल्या गावातील आई बहिणींचे कुंकू वाचविण्यासाठी अन्नत्याग केला आहे. पोलिसांना आठ तास काम मिळावे, पोलिसांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य मिळावे, चांगले घर मिळावे अशी वेगवेगळी आंदोलने करून अझाद मैदान, मंत्रालय गाजवणारी रणरागिनी गावात दारुबंदी व्हावी म्हणून लढाई लढत असताना पोलीस प्रशासनाने तिची दखल घेतली नाही हे मोठे दुर्दैव आहे. धर्मपूरी व पंचक्रोशीतील दारुबंदी दोन दिवसात झाली नाही तर प्रहार संघटना प्रहार स्टाईलने उग्र आंदोलन करेल असा ईशारा श्री खुपसे यांनी दिला आहे.

यावेळी उपोषण कर्ती पोलीस पत्नी यशश्री पाटील यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विरेष प्रभू यांचे काम अतिशय चांगले आहे असे असताना जिल्ह्याच्या पश्चिम टोकाकडेच त्यांचे दुर्लक्ष होत आहे.