अनिकेतच्या हत्येतील आरोपी पीएसआयला पाहिजे घरचे जेवण –

0
791

सांगली :-

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे तुरुंगातही आपली बडदास्‍त करत आहे. कामटेने तुरुंगाचे जेवण नाकरले आहे. कोठडीत सरकारी जेवण नको, तर मला घरगुतीच डबा हवा. अशी मागणी त्याने केली आहे. एवढा मोठा गुन्हा करूनही कामटेने आपला मुजोरपणा सोडला नाही. कोथळेच्या हत्‍येप्रकरणी कोठडीत असलेला कामटे आणि त्‍याचे सहकारी अरापी सीआयडी पथकाला तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याचा तपास करीत असताना कामटेसह त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. थर्ड डिग्रीचा वापर केल्याने त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी बुधवारी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे यांना अटक केली होती. त्याचवेळी त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पोलिस यंत्रणा हादरली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि त्यांच्यावर कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.