आनंद राऊत यांचे निधन

0
811

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

 

तालुक्यातील जावरा येथील रहिवासी आनंद मनोहरराव राऊत (वय-32) यांचे पोटाच्या आजाराने हैद्राबाद येथे उपचार सुरू असतांना नुकतेच दुख:द निधन झाले.

 

आनंद राऊत यांचा 14 महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. तसेच तालुक्यात एक उत्कृष्ट कबड्डी खेडाळु म्हणुन प्रचलित होते. अंत्यविधिला जावरा या गावी खेडाळु व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

एक कमावता युवा मुलगा अचानक निघुन गेल्याने राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  त्यांच्यामागे वडिल मनोहरराव राऊत, आई सुषमा राऊत, भाऊ सुमित, पत्नी किरण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.