चिमूर पोलिसांची कवठाळा शेत शिवारात ७७,५२० रुपयांची दारू पकडली

0
711
Google search engine
Google search engine

चिमूर / महेश कोडापे –

चिमूर पोलीस हद्दीत अवैध दारू विक्री करण्यावर अंकुश लावण्याची कामगिरी ठाणेदार श्री दिनेश लबडे यांचे नेतृत्वात होत असून नुकतीच कवठाळा शेत शिवारात मोहफुलाची दारू पकडण्यात आली असून आरोपी फरार आहे.

कवठाळा शेत शिवारात मोह फुलांची दारू काढत असल्याचा सुगावा लागताच भट्टी वर धाड टाकण्यात आली मोह सडवा ४०० लिटर ची ६० हजार रुपये ,दारू गाळण्याचे साहित्य २५२० रुपये ,मोटार सायकल एम एच बी डब्लू ५८९३ ची किंमत १५ हजार रुपये अश्या मुद्देमाला सह एकूण ७७५२० रुपये ची मोह फुल दारू ठाणेदार दिनेश लबडे चे नेतृत्वात पोहवा खुशाल टेकाम, पोशी सचिन गजभिये ,रुपेश वाढई यांनी पकडली असून आरोपी शेखर मेश्राम व इतर २ आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या धाड सत्र कारवाईने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे