हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचा दृढ विश्‍वास निर्माण करणारी आणि हिंदूऐक्य साधणारी दादर, मुंबई येथील हिंदू एकता दिंडी

0
598
Google search engine
Google search engine

मुंबई – 

समाजात अनेक संघटनांकडून दिंडी, मिरवणुका यांचे आयोजन होतच असते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दादर येथे आयोजित केलेल्या हिंदू एकता दिंडीची गोष्टच वेगळी ! हिंदू राष्ट्र येण्यासाठी हिंदूंचे संघटन अपरिहार्य ! असे संघटन उभारण्यासाठी चैतन्यदायी हिंदु एकता दिंडीसारखा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. मनात एकच ध्येय बाळगून एकत्रितपणे, संघटितपणे पावले टाकल्याने ईश्‍वरी चैतन्यामुळे सर्वांची मनेही एक होतात ! दादर, मुंबई येथील या हिंदू एकता दिंडीत हेच अनुभवता आले ! शेवटी दिंडीचे भव्य सभेत रूपांतर झाले. या वेळी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचा दृढ विश्‍वास चैतन्यदायी दिंडीत सहभागी झालेल्या ७०० हिंदुत्वनिष्ठांमध्ये निर्माण झाला !

दिंडीत उपस्थितांचा क्रम पुढीलप्रमाणे…

प्रारंभी धर्मध्वज हातात घेतलेले धर्माभिमानी, त्यानंतर हिंदु ऐक्य दिंडीचा फलक हातात धरलेले हिंदू, मान्यवर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणार्‍या रणरागिणी शाखेचे पथक, एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचे पथक, लेझीम पथक, हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याची माहिती देणारा चित्ररथ, हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगणारा बालकक्ष, विविध संघटना आणि संप्रदाय यांचे कार्यकर्ते, चित्ररथ, उद्घोषणा यंत्रणा, हिंदु जनजागृती समितीचा फलक हातात धरलेले कार्यकर्ते !

उत्स्फूर्त घोषणा

‘एकच लक्ष्य, एकच ध्येय – हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र’, ‘अपनी धरती, अपना राष्ट्र, अब केवल एकही लक्ष्य हिन्दू राष्ट्र, हिन्दू राष्ट्र’, अशा उत्स्फूर्त घोषणा देत भव्य दिंडी काढण्यात आली.