सन२०१९ पर्यत गोसीखुर्द च्या मोखबर्डी योजनेचे जल पूजन करणार – आमदार श्री किर्तीकुमार भांगडीया

0
1463
Google search engine
Google search engine

शंकरपूर येथील तीन वर्षे पुर्ती व स्नेहमीलन कार्यक्रम

चिमूर (महेश कोडापे)

चिमूर विधान सभा क्षेत्राची सेवा करण्याची संधी दिली भाजप सरकार च्या माध्यमातून शेतकरी ,शेतमजूर, युवकांसाठी काम करीत आहे संघर्ष यात्रा हि गोपीनाथ मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काढली होती तर विरोधी पक्ष असलेल्या कांग्रेस ने पाखनडी संघर्ष यात्रा काढली होती एम एस इ बी वर मोर्चा काढून समस्या सुटली का असा टोला मारीत आमदार श्री किर्तीकुमार भांगडीया म्हणाले की ६० वर्ष सरकार असताना तहसील का केली का नाही तर आम्ही विकास कामात राजकारण करीत नाही आम्ही शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही शेतकऱ्यांना केवळ कांग्रेस ने भूलथापा दिल्या गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही विरोधकाना वेळच उत्तर देईल चिमूर विधान सभा क्षेत्रात तीन ते साडे तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदेडा व आंबोली चौरस्ता भूमी चा विकास साठी निधी खेचून आणले चिमूर चे बालाजी सागर, कर्जमाफी, जलयुक्त शिवार, धडक सिंचन योजना अश्या विविध विकास ची कामे सागत महाराष्ट्रात सर्वात मोठी कर्ज माफी केली शेतकरी बांधवा साठी भाजप सरकार पाठीशी आहे कांग्रेस च्या राजवटीतील कर्जमाफी त घोटाळे झाले होते आणि कर्जे हे संबंधित शेतकऱ्यावर चढत असल्याचे प्रकरने झाल्याने भाजप सरकारने चौकशी लावली होती आणि यामुळे सखोल आंन प्रकिया ने पारदर्शकता ने कर्जमाफी केली आहे प्रलंबित प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे 2019 पर्यत गोसीखुर्द च्या मोखबर्डी च्या जलसिंचन योजनेचे जल पूजन करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणणार असल्याची ग्वाही दिली सरकार चे तीन वर्षे पुर्ती व कार्यकर्ता स्नेह मिलन कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा, वसंत वारजूकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ श्यामजी हटवादे तालुका अध्यक्ष डॉ श्री दिलीप शिवरकर , जेष्ठ नेते नीलम राचल वार, बकारांम मालोदे, ,जी प सदस्य मनोज मामीडवार, जयंत गौरकर , प्रा विजय टिपले, पस सदस्य प्रदीप कामडी , महिला आघाडी तालुका महामंत्री ज्योती ठाकरे, न का वाघे, बंडू बघेल ,शरद ,गिरडे नितीन गभने अनिल शेंडे, माजी पस सदस्य प्रमोद गुरपुडे, अविनाश बारोकर ,गजानन कामडी, डहाके गुरुजी, रासेकर , अफरोज पठाण , प्रभाकर काटवलकर, चौखे बाबूजी, बंडू पारेकर भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल, विलास मेहरकुरे बलवन्त ठवरे चिमूर विधान सभा विस्तारक सुनील किटे तालुका विस्तारक बालू हेलवटकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे भाजप जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा म्हणाले की केंद्रातील पंतप्रधान मोदी व राज्यातील फडणवीस सरकार हि मागील तीन वर्षात जनहित कार्य व विकास कामे करून अच्छे दिन आणीत असताना मात्र विरोधी पक्ष हे केवळ टीका करीत आहे जनसंघ पासून तीन पिढी पासून जनता सम्परीत होऊन काम करीत असताना जनतेने बहुमताने भाजप ची सरकारे दिली अत्यन्त विद्वान पंतप्रधान मोदीजी मिळाले नोटबंदी ला एक वर्ष झाले असताना विरोधी पक्ष हे काळा दिवस पाळत असून हास्यास्पद आहे नोट बंदी ने भ्रष्ठचार मुक्त भारत बनविण्यासाठी महत्वपूर्ण झाली जीएस्टी हि मागील चार महिन्यात बारा कोटी आय जमा झाली ग्रामीण भागातील महिलांना उजवला गॅस योजना सुरु केली अश्या विविध जनहित योजना सुरु केल्या
दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय, व सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून वसन्त चौधरी यांचे स्वागत गीताने सुरुवात झाली यावेळी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कार्यकर्त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भाजप सरकारचे तीन वर्षे पुर्ती निमित्य च्या स्नेह मिलन कार्यक्रम चे प्रास्ताविक भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर ,संचालन मातीखंदे मॅडम तर आभार विजय टिपले यांनी केले कार्यक्रम यशस्वी ते साठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते प्रफुल खोब्रागडे,सावन गाडगे, पपु डांगे, गजानन कामडी अरविंद राऊत , नारायण चौधरी,कँनु बघेल ,आशिष टिपले , नाना ढोक आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी शंकरपूर डोमा व भिसी आंबोली जी प क्षेत्र मधील बूथ अध्यक्ष , विस्तारक व भाजप पदाधिकारी ,कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते या स्नेह मिलन कार्यक्रमास दोन हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती