हिंदूह्रदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत नेञ व आरोग्य शिबिर संपन्न

0
1080

चिमूर / महेश कोडापे –

चिमूर तालुक्यातील शिवसेना च्या वतीने हिंदूह्रदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत नेञ व आरोग्य शिबिर पार पडले.

चिमूर शिवसेना तालुका प्रमुख श्री धरमसिंह आर वर्मा यांनी आयोजित केलेले दिनांक 12 नोव्हेंम्बर 2017 रवीवार ला सकाळी 10 ते 5 वाजता गुरूदेव मंडळ नवतळा येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले यात 245 रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले

ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शिवसेना चे उपतालुका प्रमुख श्री देविदास गिरडे , केवलसिंग जुनी विभाग प्रमुख श्री दिनेश घुग्घूसकर केशव नन्नावरे उपविभाग प्रमुख खुशालभाऊ वाघे सुभम पारखी नवतळा शाखा प्रमुख धनशाम उईके सुनिल नागोसे कुंदन भोयर गुणवंत शिवरकर युवा सेना शाखा पदाधिकारी प्रविण दहीकर व कार्यकर्ते उपस्थित होते.