यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या

0
578

यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील आश्रमशाळेत शिकणा-या सात वर्षाच्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. कु संदिप शेळके असे विद्यार्थ्याचे नाव आहे. संदिप पहिल्या वर्गात शिकत होता.

संदिप कालपासून आश्रमशाळेत आला नव्हता. तो बपता होता. त्याचा शोध घेत असताना आज सकाळी संदिपचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अढळून आला. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गाव-यांमध्ये प्रचंड संतापाचा वातावरण आहे. ह्या हत्यामागचे कारण अद्याप कळाले नसून, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत