जीएसटी कायद्याविषयी जनजागृतीपर कार्यशाळा

0
546
Google search engine
Google search engine

बुलडाणा-

 कर व सेवा कर जनजागृती कार्यशाळा नुकतीच विक्रीकर कार्यालय खामगांव यांच्यावतीने चिखली व मलकापूर येथे संपन्न झाली. चिखली येथे जवाहर अर्बन बँकेच्या सभागृहात, तर मलकापूर येथे मलकापूर अर्बन बँकेच्या गोळवलकर गुरूजी सभागृहात पार पडली.
मलकापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंदडा व प्रमुख उपस्थितीत विक्रकर उपायुक्त टी. के पाचरणे होते. तसेच चिखली येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहेती, तर प्रमुख उपस्थितीत सहायक विक्रीकर उपायुक्त डॉ. पी. बी राठोड होते.
कार्यशाळेत जीएसटी कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक विक्रकर विभागाच्या अधिकारी यांनी केले. या कायद्यातील तरतूदींविषयी माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. तसेच पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे कायद्याच्या महत्वाच्या तरतूदी विक्रीकर निरीक्षक यु.एस देशमुख, जी.एस अवचार व आर.एच बोराळे यांनी सांगितल्या. प्रमुख मार्गदर्शन एम.एम खुणे, डी. जे पाटील यांनी केले. यावेळी व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने व्यापारी व कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.