शेतकऱ्यांनी आ.डॉ.अनिल बोंडे यांचा केला सत्कार – आमदारांनी घेतले झोंबाडीच्या हनुमान मंदिराचे दर्शन.

0
1102
Google search engine
Google search engine

वरुड (अमरावती):-

ग्राम बेनोडा परिसरातील झोंबाडी शेतशिवारातील चमत्कारी बालयोगी हनुमान मंदिर व दादाजी दरबाराला मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. श्री अनिल बोंडे यांनी भेट देऊन महापुरुषांना नतमस्तक करीत आशीर्वाद घेतले, त्याच बरोबर हनुमान मंदिरात आयोजित असलेल्या महाप्रसादाचा लाभ हि आ.डॉ.श्री अनिल बोंडे यांनी घेतला. यावेळी बेनोडा सर्कलचे सामाजिक कार्यकर्ता बाळूभाऊ मुरुमकर, संजय पवार यांच्यासह हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान मंदिराला जाण्यासाठी रस्ता नसल्याने आमदार डॉ.श्री अनिल बोंडे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक शेतकरी बांधवांनी आ.डॉ.अनिल बोंडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

ग्राम बेनोडा व परिसरातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतावर जाण्यासाठी पांदन रस्त्याची मागणी स्थानिक शेतकरी बांधवांनी आ.डॉ.श्री अनिल बोंडे यांच्याकडे केली होती. या मागणीला आ.डॉ.श्री अनिल बोंडे यांनी दुजोरा देत बेनोडा – झोंबाडी पांदन रस्त्यावर निधी उपलब्ध करून दिला व मातीकाम पूर्ण केले. याच अनुषंगाने स्थानिक शेतकरी बांधवांनी आ.डॉ.श्री अनिल बोंडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. त्याबरोबर झोंबाडी हनुमान मंदिरालगत असलेल्या नाल्यावरून पाणी वाहत असल्याकारणाने तेथून जाणे शक्य होत नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी पुलाची मागणी सुद्धा केली. याला हि आ.डॉ.श्री अनिल बोंडे यांनी दुजोरा देत पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.