बनावट बियाणे व खतांच्या तक्रारींकरीता समित्या स्थापन • तालुकास्तरीय समित्यांचाही समावेश

0
619
Google search engine
Google search engine

बुलडाणा –

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये गुणवत्तापूर्ण रासायनिक खते, किटकनाशके, बियाणे वेळीच उपलब्ध होण्यासाठी आणि बनावट कृषि निवीष्ठांच्या तक्रारींकरीता जिल्हा व तालुका स्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीचे तक्रार निवारण कक्ष जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषि विकास अधिकारी कार्यालयात आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 07262-242389 व 07262-242343 आहेत.
त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषी कार्यालयात तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे : 
बुलडाणा – तालुका कृषी अधिकारी 07262-242610 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07262-242371, चिख्रली – तालुका कृषी अधिकारी 07264-242716 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07264-242054, मेहकर – तालुका कृषी अधिकारी 07268-224550 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07268-224539, लोणार – तालुका कृषी अधिकारी 07260-221764 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07260-221332, दे.राजा – तालुका कृषी अधिकारी 07261-232203 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07261-232018, सिं.राजा – तालुका कृषी अधिकारी 07269-234368 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07269-234232, मोताळा – तालुका कृषी अधिकारी 07267-245326 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07267-245233, मलकापूर – तालुका कृषी अधिकारी 07267-222201 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07267-222044, नांदुरा – तालुका कृषी अधिकारी 07265-221716 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07265-221018, खामगांव-तालुका कृषी अधिकारी 07263-255210 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07263-254932, शेगांव- तालुका कृषी अधिकारी 07265-254076 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07265-252052, जळगांव जामोद– तालुका कृषी अधिकारी 07266-221556 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07266-221737, संग्रामपूर– तालुका कृषी अधिकारी 07266-254076 व कृषी अधिकारी पंचायत समिती 07266-252052.
तरी शेतकऱ्यांनी बनावट बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांच्याबाबत तक्रारी तसेच वेळेवर कृषि निविष्ठा न मिळाल्यास उपरोक्त तक्रार निवारण समित्यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.