आपच्या आमदार अलका लांबा यांचे केंद्र सरकारवर टीका करतांना संतापजनक ट्विट ! – (म्हणे) ‘गायीला मासिक पाळी आली असती, तर ‘सॅनिटरी पॅड’ जीएस्टीतून बाहेर असते !’ @lambaalka

0
675
Google search engine
Google search engine

राजकीय विरोधासाठी अशा प्रकारे गोमातेचा अवमान करणार्‍या लांबासारख्या महिला नेत्या महिलांसाठी लज्जास्पद आहेत ! याचा महिला संघटना विरोध करतील का ?

 

नवी देहली – आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या आमदार अलका लांबा यांनी गोमातेविषयी अत्यंत हिन आणि अश्‍लील विधान करून स्वतःची विकृत मानसिकता उघड केली आहे. केंद्र सरकारने नवीन कररचना असणारा ‘जीएस्टी’ (वस्तू आणि सेवा कर) देशभरात लावला आहे. यात महिलांसाठीच्या ‘सॅनिटरी पॅड’वर २८ टक्के जीएस्टी लावण्यात आला आहे. याचा विरोध करण्यासाठी लांबा यांनी ट्विट करतांना लिहिले आहे की, ‘गाय माता आहे; मात्र तिला मासिक पाळी येत नाही. जर आली असती, तर भक्त लोकांनी मोदीजी आणि जेटलीजी यांना सांगून सॅनिटरी पॅडला जीएस्टीतून बाहेर काढले असते.’ अलका लांबा यांच्या या ट्विटचा विरोध केला जात आहे. याविषयी लांबा यांना लाज वाटली पाहिजे, अशा प्रकारची टीका त्यांच्यावर होत आहे.