*देशी दारू दुकान उघडण्याचा डाव  महिलांनी हाणून पडला*

397
*आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात दारू महिलांनी दुकानासमोर दिला ठिय्या*
 राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आंतमध्ये असलेली सर्व देशी दारू आणि बिअर बारची दुकान हटविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर वरुड शहरातील २ देशी दारूचे दुकान शिल्लक राहिलेली होती. अश्या स्थितीत सुरु असलेली दुकाने सुद्धा बंद करण्याच्या मागणीसाठी  गेल्या१० दिवसापूर्वी आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात देशी दारू दुकानासमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन छेडण्यात येऊन  दुकानांना सील लावण्यात आले होते परंतु या दोन्ही दुकानदारांनी सील तोडून हि दुकाने पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने आज दुपारपासून अखेर पुन्हा आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे नेतृत्वात महिलांनी दारू दुकानांसमोर ठिय्या दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या १ एप्रिल पासून राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या जवळील दारूची दुकाने बंद झाली आहेत. वरुड शहरातील २ देशी दारूची दुकाने शिल्लक असलेल्या दुकानासमोर यात्रेसारखी गर्दी होत होती त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे विशेषतः महिलांचे व मुलींचे जीवन असुरक्षित व धोकादायक झालेले होते. या दुकानांमुळे परिसरातील लोकांना त्रास असह्य झालेला होता. सर्व मातृशक्तीने पुढाकाराने शहरातील शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन्ही देशी दारू दुकानांसमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन करून लोकांचा विनाश हटवा, दारूला समाजातून हटवा या उद्देशातून देशी दारूंची दुकाने शहराबाहेर हद्दपार करण्याकरिता व आपले शहर दारूमुक्त जनसत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते व दोन्ही दुकानांना सील ठोकून यापुढे हि दुकाने उघडण्यात येऊ नये, जर उघडल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता, परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी या दोन्ही दुकान मालकांनी स्वतःच सील तोडले आणि पुन्हा दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिसरातील महिलांनी व युवकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पडला. यासंदर्भात आमदार महोदयांना माहिती दिल्यानंतर आमदार डॉ.अनिल बोंडे व डॉ.सौ.वसुधाताई बोंडे यांनी तातडीने दारूच्या दुकानाजवळ आले आणि त्या देशी दारू दुकानासमोर ठिय्या दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण युवक-युवतींनी विशेषतः महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी आमदार डॉ.बोंडे यांनी महिलांची दारूमुक्ती समितीची स्थापना करण्यात आली.
आजच्या या आंदोलनात पंचायत समिती सदस्या सौ.अर्चनाताई तुमराम, वरुड नगर परिषदेचे उपाध्यक्ष किशोर भगत, गटनेता व नगरसेवक नरेंद्र बेलसरे, हरिष कानुगो, मनोज गुल्हाने, राजु सुपले, योगेश चौधरी, देवेंद्र बोडखे, नगरसेविका सौ.नलिनीताई रक्षे, सौ.पुष्पाताई धकीते, सौ.रेखाताई काळे, सौ.मंदाताई आगरकर, सौ.शुभांगीताई खासबागे, सौ.छायाताई दुर्गे, सौ.सुवर्णाताई तुमराम, सौ.अर्चनाताई आजनकर, सौ.भारतीताई माळोदे, स्वीकृत सदस्य संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, युवराज आंडे, भारत खासबागे, सुरेश दुर्गे, अॅड.सागर मालपे, राजेंद्र काळे, प्रकाश माळोदे, संजय आगरकर, हारून शहा, प्रभाकर दौड, राहुल पाटील यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात