बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवरील बलात्काराच्या प्रकरणी नझरूल इस्लाम याला जन्मठेप

0
560
Google search engine
Google search engine

कोलकाता – बंगालच्या नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथील चर्चमध्ये एका ७२ वर्षीय ननवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी नझरूल इस्लाम याला कोलकाता न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नझरूल इस्लाम आणि त्याचे इतर ५ सहकारी यांना चोरीच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. १४ मार्च २०१५ या दिवशी नझरूल इस्लाम आणि त्याच्या सहकार्‍यांनी ननवर बलात्कार करून चर्चमधील ६ लाख रुपये मूल्याच्या मौल्यवान वस्तू पळवल्या होत्या. या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. यातील मुख्य आरोपी नझरूल इस्लाम याला बलात्काराच्या प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.