सबका साथ सबका विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणा – आमदार श्री चरण वाघमारे

438
भंडारा
 पंचायत समिती मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाच्या असंख्य योजना राबविल्या जातात. या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यान्वीत यंत्रणांनी योग्य नियोजन व अंमलबजावणी करावी. तसेच लोकप्रतिनिधी तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विविध शासकीय योजनांचे लाभकार्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सबका साथ सबका विकास ही संकल्पना राबवावी, असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले. पंचायत समिती तुमसरच्या वतीने आयोजित आमसभेत ते बोलत होते.
आमसभेला सभापती कविता बनकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार गजेंद्र बालपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, जि.प.सदस्य संदीप टाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, नायब तहसिलदार हरिश्चंद्र मडावी, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, हिरालाल नागपूरे, धमेंद्र तुरकर, नगरसेवक सुनिल पारधी, रजनीश लांजेवार, मेहताब सिंग ठाकूर, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. आमसभेत 15 विभागाचा कार्य आढावा मागील सभा अनुपालनासहीत विविध विभाग प्रमुखांनी सादर केला. याप्रसंगी आमदार दत्तक ग्राम रोंघा येथे मागेल त्याला शेततळे या योजनेत शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन जास्तीत जास्त शेततळयांचे बांधकाम केल्याबद्दल कृषी सहाय्यक दिनेश उईके यांचा सत्कार करण्यात आला.
तुमसर तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना तसेच इतर विभागाच्या तक्रारीचा आढावा आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर येथे पंचायत समितीच्या आमसभेत घेतला. ग्रामीण भागातील या समस्या महत्वाच्या असून शासकीय यंत्रणेनी तया प्राधान्याने सोडवाव्यात असे निदे्रश आमदार वाघमारे यांनी दिलेत. सध्या उन्हाळयाचे दिवस असून ग्रामीण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांनी वेळेत निकाली काढाव्यात असेही ते म्हणाले. शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात याव्या अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने मुद्रा बँक योजनेचे तयार केलेल्या पोस्टर्स चे विमोचन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कायापालट योजनेत तसेच डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार योजनेत पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल डॉ. आशिष नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबुब कुरेशी, तालुका आरोगय अधिकारी या तर स्मार्ट ग्राम 2016-17 मध्ये ग्रामपंचायत डोंगरी बुज. चे सरपंच ममता घडले व ग्रामविकास अधिकारी ए.एम.धमगाये यांचा सत्कार करण्यात आला.
आमसभेला पंचायत समिती सदस्य शिशुपाल गोपाले, सरपंच गजानन लांजेवार,राधेशाम गाढवे, गुरुदेव भोंडे, विमल नाकतोडे, मंगला कनपटे, अशोक बंसोड, रेखा धुर्वे, मालिनी वहिले, जितेंद्र सयाम डॉ. हरेंद्र राहांगडाले, मदन भगत, वसंत बिटलाये, टी.डी.शरणागत, रिता मरसके, विरेंद्र दमाहे, रिना मासूरकर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी केले. आमसभेचे संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे यांनी आभार पशुधन विकास अधिकारी यांनी मानले. 
जाहिरात