अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी श्री शरद पवार स्वतः धावून गेले

376

नागपूर :-

आज शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला कारने जात असताना रस्त्यात त्यांना दोन टिप्परच्या मध्ये एक कार अपघातामुळे अडकलेली दिसली. या कारमध्ये पती – पत्नी, एक मुलगा आणि एक सहा वर्षांचा लहान मुलगा जखमी झाले होते.

यावेळी शरद पवार यांनी त्या ठिकाणी आपला ताफा थांबवला आणि पोलिसांना त्या अपघातातील जखमींना बाहेर काढायला सांगितलं.

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

जाहिरात