श्री. अविनाश पांडे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी वर सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी म्हणून नियुक्ती.

300

अविनाश पांडे हे १९७८ -७९ या वर्षी नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सचिव म्हणुन निर्वाचित झाले आणि त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये ते डॉ श्रीकांत जिचकार यांच्या नेतृत्वात प्रदेश एन एस यु आय चे उपाध्यक्ष झाले. १९८३ ला ते प्रदेश एन एस यु आय चे अध्यक्ष झाले . १९८५ च्या विधान सभा निवडणुकीत पूर्व नागपूर मतदारसंघातुन निर्वाचित झाले. १९८९ ला ते महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. १९९५ ला ते अ भा युवक कॉंग्रेस चे महासचिव झाले. २००६ मध्ये ते अ भा ॉंग्रेस समितीच्या ट्रेनिंग सेल चे सदस्य बनले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांची अ भा कॉंग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्रातुन पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली व ते अविरोध निर्वाचित झाले. विविध राज्यात त्यांना पक्षाने संघटनात्मक जबाबदारी दिली व ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आज पक्षाध्यक्षा मा सोनिया गांधी यांनी त्यांची अ भा कॉंग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान चे प्रभारी म्हणुन नियुक्ती केली आहे. मा सोनिया गांधी व मा राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे तो ते सार्थ करून दाखवतील

जाहिरात