चिरोडी येथे महामानव बिरसा मुंडा यांची जयंती

0
775
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे महामानव बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून स्थानिक शासकिय माध्यमिक आश्रम शाळेच्या
मुख्याध्यापिका श्रीमती पकडे, करण चतुर, शाळा व्यव.समिती अध्यक्ष संतोष भलावी,
नानासाहेब डोंगरे, डाबरे व चंद्रपुरे मॅडम उपस्थित होते. यावेळी मान्यवराच्या हस्ते
महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका पकडे, करण चतुर व नानासाहेब डोंगरे यांच्यासह अन्य
मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळेत आद्य क्रांतीकारक बिरसा
मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग व
गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.