‘एच्आयव्ही एड्स’ नावाचा कोणताही रोग नाही ! – अधिवक्त्या कमलेश जैन

0
929
Google search engine
Google search engine

पुणे :-

‘एच्आयव्ही एड्स’ नावाचा कोणताही रोग अस्तित्वात नाही. एड्सचा प्रचार म्हणजे अमेरिकी आस्थापनांचे औषधे विकून पैसा कमवण्याचे मोठे षड्यंत्र आहे. हा या शतकातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा धक्कादायक दावा करत अधिवक्त्या कमलेश जैन यांनी एड्सच्या प्रचारामागच्या विकृतीवर प्रकाश टाकला. १२ नोव्हेंबर या दिवशी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, व्यसनमुक्ती सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. संजय महाराज पाचपोत, श्री. अभय भंडारी, श्री. सचिन शिंदे, कै. राजीव दीक्षित यांचे आई-वडील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन आणि शंखनाद करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

एड्सचे धक्कादायक वास्तव मांडतांना अधिवक्त्या कमलेश जैन यांनी मांडलेली सूत्रे

१. अधिवक्त्या जैन यांनी वर्ष २००१ मध्ये एड्सच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
२. एका अयशस्वी अमेरिकी शास्त्रज्ञाने त्याचे नाव होण्यासाठी म्हणून एप्रिल १९८४ मध्ये एक नवा विषाणू शोधून काढल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले. त्यावर फ्रान्सच्या शास्त्रज्ञाने तो विषाणू पहिलेच शोधल्याचे सांगितले. त्यानंतर अमेरिका सरकारने त्यांच्या देशाच्या शास्त्रज्ञाची अपकीर्ती होऊ नये; म्हणून त्या विषाणूला दोन्ही नावे देण्याचे सुचवले. त्यानुसार एच्आयव्ही एड्स असे नाव विषाणूला दिले गेले.
३. या औषधांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये अमेरिकेने कमावले आणि अजूनही कमावत आहे. एड्स आजार शुद्ध हवा-पाणी नसलेल्या आणि गरिबी अधिक असलेल्या ठिकाणी पसरत असल्याचे भासवण्यात आले. प्रत्यक्षात आपली रोगप्रतिकारक क्षमता न्यून असणे एवढाच एड्सचा अर्थ आहे; पण वर्ष २००१ च्या काळात वर्तमानपत्रांतून अनेक कथा रचत एडस्चा प्रचार करण्यात आला.
४. गरिबी असणारा आफ्रिका खंड हा एड्सची राजधानी बनवण्याचा अमेरिकेचा विचार होता; मात्र आफ्रिका सरकारने त्यांच्या शास्त्रज्ञांच्या साहाय्याने याविषयी संशोधन केले. एड्सविषयीचा प्रचार खोटा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या देशात अमेरिकी औषध आस्थापनांची औषधे घेण्यास नकार दिला.
५. त्यानंतर भारताला लक्ष्य करण्यात आले. ज्या शास्त्रज्ञाने एड्सचा विषाणू शोधल्याचा दावा केला होता, तो अमेरिकी शास्त्रज्ञ मुंबईत आला. त्याने पत्रकार परिषद घेऊन एड्सविषीची औषधे चांगली असल्याचा दावा केला. त्या काळात ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका येथील न्यायाधिशांनी देहली येथे येऊन एड्सविषयीच्या बैठका घेतल्या. त्यात धक्कादायक गोष्ट आढळली. ती म्हणजे ७ ते १० वर्षे वयोगटातील मुलांनी ‘सेक्स’ कसा करावा, १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी ‘सेक्स’ कसा करावा, अशी पुस्तके तेथे विनामूल्य वाटली जात होती. लहान मुलांना या जाळ्यात ओढून पुढे त्यांना अमली पदार्थांची चटक लावण्याचे आणि भारतीय संस्कृती नष्ट करण्याची ती चाल होती.
६. एड्सच्या चाचण्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. जर आजार एकच असेल, तर त्याच्या चाचण्या वेगळ्या का ?
७. एड्ससाठीचे औषध घेतले, तर त्या व्यक्तीला निश्‍चितपणे मृत्यू येईल आणि त्याने औषधे घेतली नाहीत, तर ती व्यक्ती १०० टक्के जगू शकेल !
८. सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला की, भविष्यात एच्आयव्हीच्या संदर्भात कोणते पाऊल उचलायचे असेल, तर याचिकेतील सूत्रांचा विचार केला जावा.
९. अनैतिक संबंधांमुळेही एड्स होत नाही; म्हणून अनैतिक संबंधांचे समर्थन करता येणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये अनैतिक संबंधांना स्थान नाही. भारतीय संस्कृतीप्रमाणे आचरण करायला हवे. आहार-विहार ठेवायला हवा.
१०. आजही सर्रासपणे रुग्णालयात एच्आयव्हीची चाचणी करण्यास सांगितले जाते. एखाद्याची रोगप्रतिकारक क्षमता न्यून झालेली असेल, तर ती चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) येते. या संदर्भात जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.