*धि.इंन्डस्ट्रियल विव्हिंग को-आँप सोसायटीच्या कथित गैरव्यवहारातील चारही तत्कालीन संचालक निर्दोष*

0
808

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले —
अचलपूर येथील बहुचर्चित धि.इंडस्ट्रियल विव्हिंग को-अाँप सोसायटी च्या कथित गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन महाप्रबंधक व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शंकरदादा शेरकार,सचिव महादेवराव कोल्हे,व्यवस्थापक गणेश राऊत व अध्यक्ष पांडूरंगजी खरड यांची अचलपूर येथील न्यायदंडाधिकारी वर्ग १ चे न्यायाधीश प्र.के.राऊत यांनी निर्दोष घोषित केले.
    सविस्तर वृत्त असे की मागील जवळपास १४ वर्षापूर्वी प्रल्हाद नामदेवराव हेडाऊ रा.सरमसपूरा यांनी सदर्हु सोसायटीचे सदस्य नसतांना व काहीच संबंध नसतांना केवळ त्रास देण्याचे उद्देशाने गृहमंत्रालय महाराष्ट्र शासन यांचे कडे तक्रार केली.मंत्रालयाने जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे मार्फत ही तक्रार चोकशी करण्यासाठी अचलपूर पोलिस स्टेशन ला रवाना केली.यामध्ये मंत्रालयाला चोकशी करून अहवाल सादर करवा हे अपेक्षित होते मात्र अचलपूर पोलीस स्टेशन येथील चोकशी अधिकारी ज्ञानेश्वर शेगोकार याने ही चोकशी आपल्या कडे घेऊन स्वतः फिर्यादी बनून शंकरदादा यांचे सर्व विरोधकांना एकत्र करून त्यांचे कडून दादा व त्यांच्या विश्वासू सहका-यांना हथकडी लावण्याची सुपारी घेतली.तसेच शेगोकार यांनी विरोधकांसोबत मीळून दादा व त्यांच्या सहका-यांना अटक करण्याचे कारस्थान रचले व त्यांचे विरुद्ध ४०६,४०८,४६८,४७१ व ससकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करून महादेवराव कोल्हे  व गणेशराव राउत यांना अटक करण्यात आली शंकरराव शेरकार व पांडृरंगजी खरड यांनी उच्च न्यायालयातून अंतरीम व नंतर सर्वोच्च न्यायालयातून सर्शत जामीन मिळवला यामागे तथाकथित विरोधकांनी दादा व त्यांच्या सहकार्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विणकर शिक्षण संस्था बळकावून तपास अधिकारी शेगोकार यांना त्यांच्या मुलाला महाविद्यालयात नोकरी देण्याची लालूच देण्यात आली होती या तपास अधिकारी व विरोधकांच्या कटकारस्थानाबाबत दादांच्या सहका-यांनी तत्कालीन ठाणेदार,उपविभागीय पोलीस अधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार सुचना देवून सुध्दा काही उपयोग झाला नाही अखेर तब्बल १३ वर्षांनी  न्यायालयाने प्रकरण सुनावणीस घेवुन प्रल्हाद हेडाऊ,ज्ञानेश्वर शेगोकार,रमेश टापरे,वासुदेव शहाळे व महादेव तवले हे साक्षीदार तपासले त्यांनी विणकर वसाहत मध्ये भाड्यापोटी पावत्या मिळत होत्या व सोसायटीच्या प्रशाशनातून शाळा व महाविद्यालय कसे वेगळे झाले याबाबत कायदेशीर कार्यवाही बद्दल माहित नसल्याचे कबूल केले यामधून आरोपपत्रात नमूद अपहार अथवा भ्रष्टाचार याबाबत एकही ठोस पुरावा नसल्याने व एकाही पैशाचा गैरव्यवहार झाला नसल्याचे सिद्ध झाल्याने चारही व्यक्ती निर्दोष असल्याचा निर्णय न्यायदंडाधिकारी वर्ग १ अचलपूर यांनी दिला सरकारी पक्ष सरकारी वकील व आरोपी कडून अँड हरिभाऊ देशपांडे यांनी काम पाहिले.न्यायालयाने विरोधकांनी आँडीटरिपोर्ट,शासकीय अधिकारी यांचे सुस्पष्ट अहवाल,शिक्षण क्षेत्रासंबधीत न्यायालयीन निवाडे व नियमावल्या तपास अधिकारी व विरोधकांनी दुर्लक्षित करून तसेच सहकार क्षेत्रातील कायद्यानुसार जिल्हा सहनिबंधक यांचे पूर्वपरवानगी शिवाय कोणताही खटला चालवण्याचा अधिकार नसतांना केवळ आकासापोटी व लालसेपोटी कायदा व नियमांना धाब्यावर ठेवून विणकर बांधवांचे हित जपणा-या शंकरदादा व त्यांच्या प्रामाणिक व सच्च्या सहका-या विरुद्ध कारस्थान रचवून त्यांना मानसिक,शारिरीक,बौध्दिक व आर्थिक छळ केल्याचे सिध्द होते तसेच कोणतेच ठोस पुराव सादर करू न शकल्यामुळे दादा व त्यांचे सहकारी यांची निर्दोष सुटका करण्यात आली तसेच निर्दोषतेची अनेक कागदपत्रे असतांना तपास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक व स्वार्थासाठी असे निर्दोष व्यक्तींना किती परिणाम भोगावे लागतात असेही न्यायालयाने निकालात नोंदवले कारण या विनाकारणच्या न्यायालयीन व कायद्याचे कारवाईने खचून जावून शंकरदादा व पांडूरंगजी खरड यांचे तर घरातील आपल्या पतीची अस्वस्थता पाहून दादांच्या पत्नीचे याच दरम्यान निधन झाले हयात असलेले महादेवराव कोल्हे व गणेशराव राऊत बदनामी व मानसिक त्रासाने खचून गेले पण काहीही का होईना शेवटी सत्याचा विजय निश्चित असतो दादांच्या पश्चात का होईना हा बदनामीचा कंलक न्यायालयाने पुसून काढला याबद्दल दादांच्या कुटुंबीयांत व चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.आज दादांचे पुत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकार,गणेश राऊत महादेवराव कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली याप्रसंगी कुटुंबीयातील प्रल्हाद शेरकार,रजनी शेरकार,सुनिता नाडगे,प्राध्यापक नामदेवराव हेडाऊ,संजय नाडगे व सुभाष नंदनवार प्रामुख्याने उपस्थीत होते रमाकांत शेरकार यांनी याप्रसंगी असे मत व्यक्त केले की माझे वडिल व संस्थेचे माजी महाप्रबंधक शंकरराव शेरकार व त्यांच्या सहका-यांना न्याय तर मिळाला पण त्यांच्या गेलेल्या प्रतीष्ठेला कारणीभूत असलेल्या सर्वच लोकांवर मानहानीचा दावा आपण न्यायालयात दाखल करणार आहोत कारण प्रल्हाद हेडाऊ,ज्ञानेश्वर शेगोकार व त्यांचे सहकारी यांनी या अपप्रचाराचा फायदा घेऊन निर्दोष चौघांच्या आयुष्यासोबत तर खेळलेच शिवाय राष्ट्रपती व राज्य पुरस्काराने सन्मानित शेकडो विणकरांची कामधेनु असणा-या धि.व्हिवींग गायछाप सोसायटीत ज्ञान 
नसणा-या व विणकराबद्दल तिळमात्र आपुलकी 
नसणा-यांच्या ताब्यात देण्यास मतदारांना भाग पाडले जी सोसायटी आज अवसायनात निघाली असून शेकडो मजूर व विणकरांचे कुटुंबीयांवर ऊपासमारीची वेळ आणणा-यांना परमेश्वर सुध्दा माफ करणार नाही अशा लोकांना शासन व्हावे म्हणून आपण त्या चारही निर्दोष व शेकडो निष्पाप मजूर व विणकरांच्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध न्यायालयात दाद अवश्य मागू व न्याय मिळवून पुन्हा या कामधेनु स्वरूप विणकर सोसायटीला भविष्यात जुने वैभव मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे सर्वांचे वतीने आश्वासन दिले पत्रपरीषदेत सर्वच वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला उपस्थित पत्रकारांचे संस्थेच्या वतीने सचिन रावेकर यांनी आभार मानले.