अमरावतीच्या चार भाविकांचा मृत्यूपाच जखमींपैकी एक अत्यावस्थजखमींमध्ये धामणगांवच्या माजी नगराध्यक्ष

0
684
Google search engine
Google search engine

*टिहरी,उत्तराखंड:-*
अमरावती / शहेजाद खान /

केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या 9 भाविकांचे वाहन दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यावस्थ आहे. तसेच जखमींमध्ये धामणगांव रेल्वेच्या माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत यांचाही समावेश आहे. सदर घटना आज दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान गंगोत्री-केदारनाथ मार्गावरील टेहरी जिल्ह्यातल्या चंगोरा गावाजवळ घडली.
चंद्रकांत काळकर, कुंदा काळकर, मीना मुरादे, संजय पाटील सर्व रा. अमरावती असे मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. धामणगांवच्या माजी नगराध्यक्षा अर्चना राऊत, त्यांचे पती सतीश राऊत, मुलगी गौरी राऊत आणि पौर्णिमा पाटील, सुधाकर मुरादे जखमी झाले आहेत. सुधाकर मुरादे यांची प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना घटनास्थळावरुन हेलिकॉप्टरने डेहराडून येथील हिमालय हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपरोक्त नऊ भाविक आज सकाळी एचआर 79 बी 2718 क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरने केदारनाथ येथे दर्शनासाठी निघाले होते. मार्गात वाहनाचा चालक शहनवाझ याचे नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन चंगोरा जवळ दरीत कोसळले. ही घटना लगेच इतर भाविकांसह सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब हालचाली सुरु केल्या. दरीत कोसळलेल्या वाहनातून भाविकांना तातडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. परंतु चार भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला. पाच जखमी झाले. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. गंभीर जखमी मुरादे यांना तत्काळ हेलीकॉप्टरने हिमालय हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.  उर्वरितांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुरादे अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता पदावर कार्यरत आहे. संजय पाटील कंत्राटदार म्हणून कार्य करीत होते. चंद्रकांत काळकर हे सेवानिवृत्त अभियंता होते.
——————-