शिंदी बु.येथे ग्रीष्मकालीन क्रिडा व योग मार्गदर्शन शिबिर संपन्न गावकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
1146

अचलपूर(शिंदी बु.) / श्री प्रमोद नैकेले /-

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे केंद्र येथे पायाभूत शिक्षणासोबत विविध कलागुण,संस्कार व शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो याच दृष्टीने नजीकच्या शिंदी बुजुर्ग येथील जनता हायस्कूल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय अमरावती व ग्रामीण मार्गदर्शन केंद्र जनता हायस्कूल शिंदी बुजुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने दहा दिवसांचे ग्रीष्मकालीन क्रिडा व योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या शिबिरात १७ एप्रिल ते २६ एप्रिल या दरम्यान विविध क्रिडा प्रकार व योगासनाचे प्रशिक्षण शिबीरार्थ्यांना देण्यात आले.याप्रसंगी प्राणायाम,व्हालीबाँल,क्रिकेट,कबड्डी,बासरी व इतर स्पर्धा प्रकाराचे ९ ते १८ वयोगटातील सुमारे २०६ गावातील बालकांना तज्ञ मार्गदर्शक हिमांशु नंदरधने,कैलाश बद्रटीये,आदेश वरखडे,मंगेश महालक्ष्मे,तिवसकरसर,मंगेश भडांगे,शुभम ताथोड,अनुराग गाडगे,प्रवीण भलावी,जयंत चिठोरे,शेखर बाळापूरे,नितीन साबळे,बोनेसर व इतर सहका-यांनी प्रशिक्षण दिले तसेच योगप्रचारीका हरीव्दार ज्योतीताई धुळे यांचे मार्गदर्शनाखाली विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण देण्यात आले.२७ एप्रिल ला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लहाने यांचे अध्यक्षतेखाली प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांना सन्मान पत्र देऊन गौरवीण्यात आले याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जी जाधव यांनी क्रिडा व योग याचा उत्कृष्ठ संगम या शिबिरात साधला गेला त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दिव्यानंद माथने व संस्थेच्या तीनही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करीत असेच उपक्रम सतत होत राहावे याकरिता लागणा-या सुविधा व निधी विभागातर्फे पुरविण्यात येईल असे मनोगतात व्यक्त केले.दिपकजी हिंगणीकर ए.सी.एफ.सामाजिक वनीकरण अचलपूर यांनी क्रिडा,योग व सोबत निसर्ग यांचा समन्वय साधत अनेक उदाहरणातून वनस्पती व त्यांचे उपयोग पटवून दिले तसेच त्यांनी निर्माण केलेल्या जैवविवीधता उद्यान व निसर्गसंवर्धन केंद्र उपातखेडा सर्वांना आपल्या कडून एक दिवसाच्या सहलीकरीता दुस-या दिवशी घेवून जाण्याचे घोषित केले,जिल्हा समन्वयक नाम फाऊडेशन वासुदेवराव जोशी यांनी आपल्या नाम फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती देवून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले,जिल्हा परिषद सदस्या शिल्पाताई भलावी यांनी कार्याचा गौरव करीत आपणाकडून जी मदत होईल ती देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाला संस्था सदस्य दिलीप गाडगे,राष्ट्रीय हायस्कूल अचलपूरचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावातील मान्यवर मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक माथने आभार बोनेसर तर संचलन जयंत चिठोरे यांनी केले शिबिराबद्दल ज्योतीताई धुळे व कैलाश बद्रटीये यांनी सकारात्मक व बरेच काही येथे प्राप्त झाल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.