महिलांच्या स्वसंरक्षणासाठी तसेच लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कराटे फायदेशीर – गुड्डु शर्मा <><> उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन संपन्न

0
790
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-



सध्या देशात महिलांच्या छेडखानीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिला संरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. यासाठी इतरांवर अवलंबुन न राहता स्वत:च स्वत:च्या रक्षणासाठी सज्ज राहणे महत्वाचे ठरत आहे. म्हणूनच मुली-महिलांच्या स्वसंरक्षणासाठी तसेच लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कराटे  फायदेशीर आहे, असे मत अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांना व्यक्त केले. ते निशुल्क उन्हाळी कराटे शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
          ते पुढे बोलतांना म्हणाले की, कराटेमुळे संपूर्ण शरीराची हालचाल होऊन शरीराला बळकटी येते. यात नियमितपणे 45 मिनिटे व्यायाम करून घेतल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते, मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ राहते. त्यामुळे मुले निरोगी राहतात. स्थानिक अशोक महाविद्यालयात ५ मे पासुन सुरू झालेल्या १५ दिवशीय शिबीराचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणुन कु. कांचन मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुड्रु शर्मा, नंदुभाऊ सोरगिवकर आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडुन उद्घाटन करण्यात आले. आजच्या परिस्थिती स्वसंरक्षण ही बाब अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक लहान मुलांना त्यानुसार संपूर्ण प्रशिक्षण निशुल्क देण्याचा उपक्रम खास उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित करण्यात आला आहे.
       सदर शिबीराचे आयोजक देवेंद्र मेश्राम, मुधोळकर व त्यांचे सहकारी असुन पंधरा दिवसात हे स्वसंरक्षणाचे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे.