व्यावसायिकतेच्या दडपणामुळे प्रसार माध्यमांसमोर अस्थिरतेचे आव्हान · प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने या विषयावर राष्ट्रीय पत्रकार दिनी उमटला सूर

0
871
Google search engine
Google search engine

· जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

बुलडाणा

– प्रसार माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. या अवस्थेमुळे माध्यमांमध्ये अगतिगतेचे वातावरण आहे. यामुळे प्रसार माध्यम क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण आहे. माध्यम क्षेत्रात खूप स्थित्यंतरे येत आहे. माध्यम क्षेत्रात व्यावसायिकता येत आहे. त्यामुळे पत्रकारीतेचे नितीमूल्य जोपासले जात नाही. अशा परिस्थितीत व्यावसायिकतेचे दडपण या क्षेत्रावर आले असल्यामुळे या क्षेत्रात अस्थिरतेचे आव्हान निर्माण झाले आहे, असा सूर राष्ट्रीय पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उमटला.

याप्रसंगी ‘प्रसार माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मत व्यक्त करताना पत्रकार पत्रकारीतेची सद्यस्थिती, भविष्यातील आव्हाने या विषयावर चर्चा झाली. यावेळी माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी पत्रकार दिन कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पत्रकारीतेच्या निती मुल्यांची जोपासणा करणे आवश्यक आहे. माध्यमांमध्ये दररोज बदल होत आहे. सामाजिक माध्यमे, डिजीटल माध्यमांचे युग आले असून पत्रकारीतेमध्ये डिजीटल साक्षरता महत्वाची आहे.
कार्यक्रमादरम्यान पत्रकार सोमनाथ सावळे यांनी गंभीरपणे पत्रकारीतेमध्ये असलेली स्थित्यंतरे स्प्ष्ट केली. ते म्हणाले, पत्रकारीतेमध्ये स्थानिक आव्हानांसोबत आर्थिक आव्हाने मोठ्या प्रमाणावर आहे. पत्रकारांनी आपली लेखनी नेहमी सकारात्मक कामासाठी उपयोगात आणत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले पाहिजे. रणजितसिंग राजपूत यांनी सांगितले, प्रसार माध्यमांमध्ये स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आव्हाने आहेत. पुढील युगात पत्रकारांना आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम समाजात आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी लागेल. एकजूट दाखवून पत्रकारांनी आपल्या समस्या निमाली काढल्या पाहिजे.
त्याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान गणेश सोनुने, प्रा. सुभाष लहाने, संतोष लोखंडे, पुरुषोत्तम बोर्डे, भानुदास लकडे यांनी परिसंवादामध्ये सहभाग घेत आपले म्हणणे मांडले. त्यांनी प्रसार माध्यमांसमोरील आव्हानांचा उहापोह येथे केला. कार्यक्रमाचे संचलन व आभार माहिती सहायक निलेश तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार रणजितसिंग राजपूत, सोमनाथ सावळे, युवराज वाघ, संजय जाधव, सुनील तिजारे, प्रेमकुमार राठोड, पृथ्वीराज चव्हाण, रविंद्र वाघ, बाबासाहेब जाधव, चंद्रभूषण मुंगे, शौकत शहा, छायाचित्रकार निनाजी भगत, माहिती कार्यालयाचे प्रतिक फुलाडी, अनिल कुरकुटे, श्रीमती श्रेया दाभाडकर, रमेश सापटे, दिगंबर राठोड, कल्याणी दाभाडकर, सेवानिवृत्त कर्मचारी विलास जाधव आदी उपस्थित होते.