कृषि पदवीधर संघटनेतर्फे “युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा २०१७”चे आयोजन – ३० नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

0
1247
Google search engine
Google search engine

 

 

राज्य कृषि पदवीधर संघटनेतर्फे यावर्षीही ” युवाप्रताप राज्यस्तरीय कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. कृषि पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी,पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक,सामाजिक,प्रशासकीय,उद्योजकीय प्रश्न सोडवणे शासन दरबारी ते मांडणे कृषि व पूरक क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवणे व या बरोबरच शेतकरी बांधवाना कृषि व समस्त पदवीधरांच्या माध्यमातून कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे, उद्योजकतेचा विकास करणे, तसेच शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात कृषि पदवीधर बांधवांच्या माध्यमातून सहभाग घेणे आणि एकूणच कृषि क्षेत्रात नवनवीन कृषि व पर्यावरण विषयक पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे हि विचारधारा संस्थे द्वारे कार्यरत आहे.

राज्यातील कृषी,पर्यावरण-निसर्ग संवर्धन,युवा संघटन,महिला सक्षमीकरण,पत्रकारिता, कला,सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या कार्याला गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते. कृषि,पर्यावरण-निसर्ग संवर्धन,कला-क्रीडा,संशोधन,शिक्षण-सेवा,पत्रकारिता,सामाजिक कार्य,अकृषक उद्योग,महिला विकास,युवा संघटन इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांनी पुरस्काराकरिता दिनांक ३० नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव पाठवावा.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुछ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कृषि व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

अधिक माहिती करीता ८२३७५७२३१५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 

www.agriandgraduates.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.