जुन्या पेंशन साठी केंद्र व राज्य सरकार यांच्यासोबत चर्चा करण्याचे पवार साहेबांचे आश्वासन – महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना निवेदन

0
754
Google search engine
Google search engine

जुन्या पेंशन साठी आता पवार साहेबांनीच लक्ष घालावे- श्री शेखर भोयर

*1 नोव्हेम्बर 2005 नंतर रुजू झालेल्या महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा*

🔸🔹🔸🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

यवतमाळ :-

जुन्या पेंशन योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार सोबत चर्चा करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिले आहे.
1 नोव्हेम्बर 2005 नंतर रुजू झालेल्या महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होण्यासाठी “साहेब आता आपणच लक्ष घालावे” अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना केली.

मा. शरदचंद्रजी पवार साहेब कार्यकर्ता मेळाव्यासाठी यवतमाळ येथे दाखल झाले असतांना महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.नदीम पटेल, श्री.प्रविण बहादे, सुरेंद्र दाभाडकर, श्री. मिलिंद सोलंके, शिक्षक महासंघाचे प्रा.नितिन टाले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.निलेश तायडे, श्री.एन. आर.राठोड उपस्थित होते.
दि.1 नोव्हेम्बर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले सर्व कर्मचारी यांना तत्कालीन शासनाने 1982 ची जुनी पेंशन योजना रद्द करुण नविन अंशदायी पेंशन योजना लागू केली.या योजनेत कर्मचारी यांचे वर्तमान व भविष्य अंधकारमय आहे. तसेच सेवेत असतांना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना तूटपुंज्या वेतनाशिवय काहीच मिळत नाही. समान काम समान वेतन कायदा असतानाही काहिना जुनी पेंशन तर काहिंना नविन पेंशन असा भेदभाव केला जात आहे.
शासनाने नविन पेंशन योजना लागु करतांना महाराष्ट्र नागरी सेवा 1982 मध्ये सुधारणा असा शब्दप्रयोग करुण प्रत्यक्षात मात्र फसवणूक केली आहे. केवळ मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिति हलाखीचि असल्याचे वित्त विभागाच्या सूचनेवरुन जुनी पेंशन योजना रद्द करुण नविन पेंशन योजनेचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला.
जुनी पेंशन योजना हा कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा मजबूत आधार असुन 1 नोव्हेम्बर 2005 नंतर रुजू झालेल्या महाराष्ट्रतील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागु करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना करण्यात आली.यावेळी याबाबत केंद्र व राज्य सरकार सोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन पवार साहेब यांनी दिले आहे.