शेती अरिष्टावर मात करण्यासाठी सोमवारी किसान सभेचा संसदेवर महामोर्चा – आज रात्री चांदुर रेल्वेतुन दिल्लीसाठी रवाना होणार कार्यकर्ते

0
1033

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

शेती अरिष्टावर मात करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिल्ली येथील संसदेवर महामोर्चा व महा पडाव आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतीमालाला रास्त भाव, सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी, डॉ. स्वामीनाथन आयोग लागु करा, 60 वर्षावरील शेतकरी-शेतमजुरांना पाच हजार रूपये पेन्शन लागु करावी आदी मागण्यांसाठी व सरकारच्या शेतकरी धोरणाविरूध्द निषेध नोंदविण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संसदेवर महामोर्चा व महा पडाव आंदोलन सोमवारी करण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. कॉ. अजीत नवले करणार आहे. यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते आज शनिवारी रात्री अमरावती येथील गांधी चौकातील पक्ष कार्यालयात एकत्र होऊन दिल्लीकरीता रवाना होणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, कार्यकर्त्यांनी यामध्ये शामील व्हावे असे आवाहन किसान सभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष कॉ. देविदास राऊत, कॉ. गणेश कुमरे, कॉ. संतोष मारबदे, कॉ. सत्यवान गोंडाणे, कॉ. संजय वानखडे, कॉ. मालाबाई बोबडे, कॉ. शंकरराव नारनवरे, कॉ. संजय बकाले, कॉ. अनिल देशमुख, कॉ. राजीव कडुकार, कॉ. सुधाकर राऊत आदींनी केले आहे.