चलबुर्गाजवळ भीषण अपघात, सहा ठार – ७३ जणांना घेऊन जाणार्‍या बसचे तुकडे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

0
1318
Google search engine
Google search engine

लातूर:

 

लातूर निलंगा मार्गावर आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. यातील ३० जणांची प्रकृती गंभीर आहे. १९ जण लातुरच्या सर्वोपचार रुगणालयात उपचार घेत आहेत. काहीजणांना लातुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये औसा येथील बाळू यांचा समावेश आहे. मालवाहू ट्रक लातुरकडे येत होता. अती वेगाने आलेल्या ट्रकने बसच्या मधोमध धडक दिली. बसचे चक्क दोन तुकडे झाले. ही बस निलंगा आगाराची आहे. ती लातूर-निलंगा शटल सेवेत रुजू होती. मालवाहू ट्रकचा क्रमांक एमएच १३ एके ४८३१ असा आहे.

 

 

तर बसचा क्रमांक ९६११ असा आहे. ट्रकचालक गंभीर जखमी आहे, बसचाही चालक उपचार घेत आहे. बसचालकाचे नाव नरेश साबणे असे आहे. तर ट्रक चालकाचे नाव रायबा वटारे असे आहे. बस खच्चून भरलेली होती. बसमध्ये ७३ प्रवासी होते असंही सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये नागनाथ यमपुरे बसवकल्याण, मंगलबाई शिंदे हेळंब, दोन वर्षांची श्रृती पटील मुळेवाडी निलंगा, गणपत राठोड मोरेवाडी बसवकल्याण यांचा समावेश आहे.