पद्मावती चित्रपट 1 डिसेंबर ला प्रदर्शित होणार नाही – निर्मात्यांनी घेतला निर्णय

0
680

मुंबई : बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. 1 डिसेंबर रोजी रीलिज होणारा हा सिनेमा आता पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन रीलिजिंग डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे. सीबीएफसीकडून अद्याप पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यातच या सिनेमाचं मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.