श्री संत सावता माळी युवक संघाच्या राज्य कार्यकर्ता मेळावा संपन्न <●> समाजाचा विकास संघटनेशिवाय शक्यच नाही – हभप श्री  रमेश महाराज वसेकर

0
1051
Google search engine
Google search engine

नगर –

बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे प्रगतींच्या वाटांना पायबंद बसत आहे. परिवर्तनाच्या वाटेवर असणार्‍या समाजाचा विकास संघटनेशिवाय शक्यच नाही. युवा पिढीच्या खांद्यावर समाजाची पर्यायाने देशाची व मानवतेची मोठी जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. याकरीता संघटनातूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन आद्य संत सावता माळी महाराजांचे 17 वे वंशज हभप रमेश महाराज वसेकर यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट राज्य संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या समाज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी हभप वसेकर बोलत होते. याप्रसंगी हभप सुनिल गिरीजी महाराज, संघाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र भुषण सचिन भाऊसाहेब गुलदगड, माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव, राज्य सचिव सुनिल गुलदगड आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रथमत: मान्यवरांच्या शुभहस्ते श्री संत सावता माळी महाराजांची महाआरती संपन्न झाली. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनानंतर दीपप्रज्वलन संपन्न झाले. युवक संघाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी युवक संघाची भुमिका विषद करताना सांगितले की, फक्त समाज संघटन एवढेच उद्दिष्ट नसून, अन्याय, अत्याचार, व्यवस्थेविरुद्ध युवकांचा दबाव गट निर्माण करणे हे अंतिम ध्येय आहे. संत सावता माळी व महात्मा फुले विचारांचा प्रचार व प्रसारातून निकोप समाज निर्मितीचा युवक संघाचा मानस आहे.
अ‍ॅड.धनंजय जाधव यांनी शुभेच्छा देतांना सांगितले की, बदलत्या विषमतेविरुद्ध एकत्र येवून विचारांची समता प्रस्तापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचे गरजेचे आहे. संत सावता माळी युवक संघाच्यावतीने युवकांचे जे संघटन सुरु आहे, त्यातुन राज्यभर चांगले उपक्रम राबविले जात आहेत. समाज जागृतीबरोबरच समाज निर्मितीचे कार्य हे युवक करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हभप सुनिल गिरीजी यांनी कार्यकर्त्यांच्या गौरव करताना विषद केले की, युवक संघाला मानवतेचे अधिष्ठान आहे. संघटनांचे व्रत अंगिकारल्यांना आता मोठी झेप घेण्याची आवश्यकता आहे.
यावेळी संत सावता माळी संघाच्या 27 जिल्ह्यातील शाखांच्या पदाधिकार्‍यांचा मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले तर आभार संघाचे विभागीय अध्यक्ष कैलासराव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी 27 जिल्ह्यातून सुमारे 5 हजारवर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय जाधव, अजिंक्य मेहेत्रे, सागर खरपुडे, मंगेश दरवडे, विजय दळवी, डॉ.भगवान चौरे, गणेश शिंदे, सिद्धार्थ रासकर, धीरज खेतमाळस, धिरज नन्नवरे, राजेंद्र धाडगे, सुरज विधाते, संजय दळवी, संतोष सोनटक्के, किरण बनकर आदिंनी परिश्रम घेतले.