वित्त विभागाची संकेतस्थळे कामकाजासाठी बंद राहणार सर्व शासकीय कार्यालयांना कोषागार कार्यालयाच्या सूचना

0
1088

अमरावती –

वित्त विभागाशी संबंधित विविध सेवा देणारी संकेतस्थळे कामकाजासाठी 6 ते 11 मेपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये व ‘डीडीओ’ (आहरण व संवितरण अधिकारी) यांनी अत्यावश्यक कारणांशिवाय कोषागारातून रकमा काढू नयेत, असे निर्देश वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी दिले आहेत. 
वित्त विभागाची सेवार्थ, बीम्स, बिल पोर्टल, निवृत्त वेतनवाहिनी, अर्थवाहिनी, कोषवाहिनी ही संकेतस्थळे तांत्रिक सुधारणांसाठी दि. 6 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 11 मे रोजी स. 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे, ग्रास प्रणाली 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामकाजासाठी बंद राहील.
यासंबंधी वित्त विभागाने दि. 3 मेस परिपत्रक जारी केले आहे. या कालावधीत अत्यावश्यक कारणांकरिता रकमांची गरज भासल्यास रकमा प्राप्त करुन घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत परिपत्रकात मार्गदर्शन केले आहे.