विविध मागण्यांसाठी कॉग्रेस चे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन – प्रति हेक्टर 50 हजार मदत जाहीर करा

0
714

बादल डकरे / चांदुर बाजार-

चांदुर बाजार येथील ग्रामीण तसेच शहरातील कपाशी पिकांवरील बोड अळी मुले तालुक्यातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापसाची पण क्षमता आणि गुणवत्ता पण घराब होत आहे त्यामुळे शेतकरी याना हेक्टर 50 हजार मदत करावी आणि सरसकट कर्जमाफी ही त्वरित द्यावी.कापसाला प्रति किटल 7000 भाव द्यावा,तसेच नाफेड मधील जाचक अटी काडून जसे उत्पादन झाले तशी खरेदी करावी.शेतकरी याचे वीजबिल पूर्णतः माफ करावे तो पर्यंत एक ही वीज कापणी करू नये.भूमिहीन शेतमजूर याना 2000 रुपये प्रतिमाहिना तसेच गॅस सिलेंडर ची वाढिव किंमत रद्द करावी. अश्या विविध मागण्या साठी आज तालुका कॉग्रेस पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले यावेळी कपाशी चे बोड ही तहसीलदार याच्या टेबल वर ठेवण्यात आले होते.यावेळी अचलपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री समीर देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती वाघमारे,उपसभापती श्री अरविंद लंगोटे , श्री किशोर देशमुख तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.