इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक्स समीट – 2017 मध्ये ‘महाराष्ट्र’

0
589
Google search engine
Google search engine
दिल्ली –
नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्रांगणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने 3 ते ५ मे दरम्यान इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक्स समीट- 2017 आयोजित करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हीलियन असून राज्य रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी), राज्य रस्ते परिवहन महामंडळ, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई मेट्रो रेल महामंडळ व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. यांचे प्रदर्शनीय स्टॉल आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, फिक्की यांच्या सौजन्याने हे समीट होत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अॅण्ड लॉजिस्टीक्स समीट- 2017 या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या त्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यानी भाग घेतला आहे.