शालेय जीवनासाठी शिबिर महत्वाचे – नगराध्यक्ष श्री निलेश सूर्यवंशी <><> पी.के.एम. शिबिराचे उद्घाटन

0
1339
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )


केवळ रिकामा वेळ आहे म्हणून किंवा छंद जोपासण्यासाठी म्हणूनच नाही तर शालेय जीवनातही उन्हाळी शिबिराला फार महत्व आहे. त्यामुळे पालकांनी या संधीचा उपयोग करुन  घ्यावा असे मत स्थानिक नगर परीषदेचे युवा  नगराध्यक्ष शिट्टू उर्फ़ निलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.  पीपल्स कला मंच व सर्व शिक्षा अभियान गट साधन केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित नाट्य अभिनय शिबिरात ते बोलत होते.


        1 मे ते 10 मे 2017 या कालावधीत पी.के.एम. उन्हाळी शिबिराचे आयोजन स्थानिक गट साधन केंद्र येथे करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल अन्देलवार, सहाय्यक गट विकास अधिकारी कु. माडकर, नगरसेवक संजय मोटवाणी, वैभव गायकवाड़, संस्थेचे संस्थापक सिद्धार्थ भोजने, गट शिक्षणाधिकारी अशोक इंगळे, विस्तार अधिकारी चव्हाण, विषयसाधन व्यक्ति विवेक राऊत, मंगेश उल्हे आदी उपस्थित होते. सदर शिबिर हे विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखण्याचे काम करीत असून शहरातील अनेकांना या शिबिरामुळे दिशा मिळ्याल्याचे संजय मोटवाणी यांनी सांगितले. तर प्रत्येक विद्यार्थी शिकतोच यावर आपला पूर्ण विश्वास असून त्या साठी च आम्ही साधन व्यक्ति काम करीत असल्याचे विवेक राऊत यांनी व्यक्त केले. सभिव्यक्ति यासाठी उन्हाळ्यातील हा सुट्यांचा चांगला उपयोग होउ शकतो मुलांमधील  सुप्त गुण ओळखण्यासाठी पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भोजने यांनी केले.     कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन गुल्नाज पठान हिने केले. यावेळी पी.के.एम.चे राहुल जगताप, रोहित तिजारे, ऐजाज हुसेन, अंकुर धाकुलकर, सूरज खरीले, पवन वाघ, तेजस लहाने, आकाश चव्हाण, अंजली चव्हाण, प्रशांत बैस, तेजस इमले, वैभव देशमुख, ऋषिकेश शेंडे आदी परिश्रम घेत आहे.