विजेच्या खांबाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू चांदूर ते अमरावती रस्त्यावर मांजरखेड जवळील घटना

0
575
Google search engine
Google search engine



चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

अमरावती येथून पुलगावकडे जाणाऱ्या  एका दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून
विजेच्या खाबांला धडकल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२) सकाळी ९ वाजता चांदूर
रेल्वे ते अमरावती रस्त्यावर मांजरखेड कसबा गावाजवळ घडली.अशोक भाऊराव लोने (वय
४०) रा नवी वस्ती बडनेरा असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अशोक भाऊराव लोने हे सकाळी ९ वाजता अमरावती येथून पुलगावला
मोटर सायकल (एमएच२७-एडब्ल्यु ९९९३)निघाले होते.रस्त्यात चांदूर रेल्वे जवळ मांजरखेड
जवळील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेच्या विजेच्या खांबावर
त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये अशोक लोने यांचा जागीच मृत्यू झाला. अशोक हे व्यवसायाने
फोटोग्राफर असल्याचे समजते.या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी कलम २७९ व ३०४(अ)
अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.