गावच्या समस्यांसाठी दानापूर ग्रामस्थ आजपासून आमरण उपोषणाला बसणार

0
537
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर (मांजरखेड) गावच्या विविध समस्या सोडविण्यासाठी
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय यांना वारंवार निवेदने दिले.
मात्र संबधीत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्यामूळे शेवटी कंटाळून  दानापूर ग्रामवासीयांनी
गावच्या समस्या सोडविण्यासाठी २३ नोव्हेंबर पासून दानापूर(मांजरखेड) येथील समाज मंदिर
समोर आमरण उषोणाला बसणार आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड व दानापूर असे दोन गाव मिळून मांजरखेड गट ग्रामपंचायत
आहे. दानापूर ३५० लोकवस्तीचे गाव आहे. गावात अनेक समस्या आहेत. त्यापैकी गावात
स्मशानभूमी नाही. त्यासाठी दानापूर येथे ३० एकर पडित ई क्लास जमीन आहे.या जमीनीतून
१ एकराचा तुकडा स्मशानभूमीसाठी देऊन तेथे पक्के स्मशानभूमी शेड बांधण्यात यावे, दानापूर
ते मांजरखेड जोडणारा अर्धा कि.मी च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, दानापूर
ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले. त्यांना प्रोत्साहनाचे १२ हजार रूपये म.गांधी
रोजगार हमी योजनेच्या फंडातून देण्यात यावे, आर्थिकदृष्टा कमकुवत असलेल्या ग्रामस्थांना
रमाई आवास योजना/प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्यात यावे, ग्रा.पं.ने १४ व्या
वित्त आयोगाचा निधी आणि दलित वस्तीचा निधी कोणत्या कामावर खर्च केला याची चौकशी
करण्यात यावी या मागण्यासाठी भावराव शिंदे, हेंमत रोकडे, अरूण राठोड, पुरूषोत्तम मोहोड,
रमेश मोहोड, शिवशंकर बगाडे, भीमराव बगाडे, श्रीरामी तायडे, रमाबाई मोहोड, अनिल
शंभरकर, शामराव मोहोड, राजेंद्र मोहोड, दिलीप वासनिक, सोनाबाई मोहोड, प्रभाकर
जिवतोडे, विलास शिंदे, सहादेव चांदणे, विलास मेश्राम, भावराव मांगुळकर, अशोक मोहोड
असे विस दानापूर ग्रामस्थ २३ नोव्हेंबरपासून दानापूर समाज मंदिर समोर आमरण उपोषणला
बसणार आहे.